FAQ
- कोणत्या सार्वजनिक मनोरंजनाच्या कार्यक्रमांना रंगभूमी मंडळाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता आहे.?
-
याबाबत संकेतस्थळावरील अधिनियम-नियम व शासन निर्णय या मुख्यशिर्षाखाली अनुक्रमांक 7 येथे नमुद दिंनाक 27/10/2017 शासन निर्णयामध्ये माहिती उपलब्ध आहे.
- नाटय संहिता कुठे व कशी सादर करावी. ?
-
याबाबत संकेतस्थळावरील पूर्वपरिक्षणाची कार्यपध्दती या शिर्षकाखाली सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
- पूर्व परिक्षणासाठी संहिता सादर करण्यासाठी अर्ज (आय फॉर्म) कुठे उपलब्ध होईल. ?
-
याबाबत संकेतस्थळावरील Related Links येथील डाउनलोड येथे Click केल्यावर संहिता पूर्वपरिक्षण अर्ज - ( I FORM ) PDF स्वरुपात उपलब्ध होईल.
- मंडळाकडून सार्वजनिक करमणूकीच्या कार्यक्रमांसाठी योग्यता प्रमाणपत्रा करिता आकारण्यात येणारे पूर्वपरिक्षण शुल्क किती असते. ?
-
याबाबत माहिती संकेतस्थळावरील नागरिकांची सनद या मुख्यशिर्षाखाली परिशिष्ट 4 (ब) येथे उपलब्ध आहे.
- संहिता पूर्वपरिक्षणासाठी कधी सादर करावी. ?
-
कोणताही करमणुकीचा कार्यक्रम करण्याची अथवा ठेवण्याची इच्छा असलेल्या कोणत्याही इसमाने, असा कार्यक्रम ज्या तारखेस पहिल्या प्रथम करण्यात अथवा ठेवण्यात यावयाचा असेल त्या तारखेच्या निदान दोन महिने अगोदर मंडळाकडून त्या कार्यक्रमाच्या योग्यतेचा दाखला मिळविण्यासाठी अध्यक्षांकडे अर्ज केला पाहिजे.
- संहिता पूर्वपरिक्षणासाठी मंडळाकडे सादर केल्यानंतर योग्यता प्रमाणपत्र (Suitability Certificate) किती दिवसांत उपलब्ध होते.?
-
रंगभूमी मंडळाच्या नियमात योग्यता प्रमाणपत्र देण्याची मुदत 6 महिने अशी आहे, तथापि सध्यस्थितीत सर्वसाधारणपणे हे प्रमाणपत्र 2- 3 महिन्यांच्या कालावधीत नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात येते.
- कायमचे योग्यता प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्यास तात्पुरते ( हंगामी ) योग्यता प्रमाणपत्र दिले जाते का.?
-
होय - काही प्रशासकीय किंवा तांत्रिक कारणास्तव कायमचे योग्यता पत्र देण्यास विलंब होत असल्यास व त्यादरम्यान नागरिकांना त्यांचा कार्यक्रम सादर करावयाचा असल्यास त्यांना त्यांच्या विनंतीनुसार मंडळाकडून तात्पुरते प्रमाणपत्र देण्यात येते.