विविध समित्या
महाराष्ट्रात सार्वजिक ठिकाणी सादर होणा-या मनोरंजनाच्या कार्यक्रमांच्या (नाटक, तमाशा, मेळा, पुरस्कार वितरण इत्यादी) सहिता/ निवेदन (Scripts /Synopsis) चे पूर्वपरिक्षण करण्यासाठी शासनामार्फत रंगभूमीशी संबंधीत नाटय लेखन, नाटय व्यवस्थापन, नाटय निर्मिती, नाटय कलाकार, कोणत्याही विद्यापीठातील मराठी नाटयशास्त्र विषयाशी संबंधित प्राध्यापक, नाटय परिक्षक, साहित्यिक, तसेच प्रतिष्ठीत नाटय आणि एकांकिका स्पर्धामध्ये तसेच रंगभूमी संबंधित महोत्सवामध्ये अविष्कार सिध्द केलेल्या व्यक्ती( कलाकार/ तंत्रज्ञ) इत्यादी क्षेत्रातील अनुभवी व्यक्तीची अशासकीय अध्यक्ष, व सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात येते, दर 3 वर्षाच्या कालावधीनंतर किंवा शासनाच्या आदेशानुसार सदर मंडळाची पुनर्रचना करण्यात येते. रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळावरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीबाबतची कार्यपध्दती बाबतचे धोरण शासन निर्णय पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग एसपीबी-2022/ प्र.क्र. 44/ सां.का.1/ दिंनाक 13 ऑक्टोबर 2022 नुसार निश्चित करण्यात आले आहे.