मराठी नाटय संहितांचे संगणकीकरण
रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाकडून सार्वजनिक ठिकाणी सादर होणा-या मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी ( नाटक/एकांकिका /लोकनाटय /तमाशा वर्ग/ मेळे इत्यादी ) नागरिकांनी तपासणीसाठी सादर केलेल्या लिखाणांचे पूर्वपरिक्षण करुन त्यांना कायमस्वरुपी योग्यता प्रमाणपत्र देण्यात येते. या कायमस्वरुपी जतन करावयाच्या “अ” वर्गीय दस्तावेजाचे (संहिता/ प्रमाणपत्र व त्यांच्या नोंदवहया इत्यादी) संगणकीकरण (Digitization ) मंडळा मार्फत मराठी नाटयसंहितांचे संगणकीकरण (कार्यक्रम) (22053152) इतर प्रशासकीय खर्च (20) या योजने अंतर्गत दरवर्षी करण्यात येते.