नागरिकांची सनद
रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ, 2 रा मजला, ठाकरसी हाऊस, शुरजी वल्लभदास मार्ग, बेलार्ड इस्टेट, मुंबई - 1
प्रस्तावना
रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाने यापूर्वी प्रसिध्द केलेल्या नागरीकांच्या सनदेमध्ये यथायोग्य सुधारणा करुन ती पुन्हा प्रसिध्द करण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी होणा-या मनोरंजनाच्या कार्यक्रमाच्या लिखाणाचे पूर्वपरिक्षण करण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम, 1951 अंतर्गत सन 1954 मध्ये या मंडळाची स्थापना करण्यात आली. सार्वजनिक मनोरंजनाच्या जागा ( सिनेमाव्यतिरिक्त) आणि मेळे, व तमाशे धरुन, सार्वजनिक मनोरंजनाचे प्रयोग यांना अनुज्ञप्ती देणे व त्यावर नियंत्रण ठेवणे नियम 1960 तसेच सुधारीत नियम 1974 नुसार मंडळाचे कार्य चालते. महाराष्ट्र शासकीय कर्मचा-यांच्या बदल्याचे विनियम आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणा-या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 मधील कलम 8 मधील तरतुदीनुसार रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ, नागरिकांची सनद प्रसिध्द करीत आहे. या विभागाशी संबंधित असणा-या सेवा तत्परतेने, सौजन्यपूर्वक व सन्मानपूर्वक नागरिकांना उपलब्ध करुन देण्यासाठी हा विभाग बांधिल राहील.
रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची रचना
रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ हा विभाग पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग मंत्रालय मुंबई या प्रशासकीय विभागाच्या नियंत्रणाखाली कार्यरत आहे. मा. सांस्कृतिक कार्य मंत्री हे विभागाचे प्रभारी मंत्री असून मंडळाचे संपूर्ण महाराष्ट्रासाठी मुंबई येथे एकच कार्यालय आहे. त्याचा तपशिल ( पत्ता, ईमेल आयडी, ऑनलाईन सेवेसाठी असलेल्या वेबसाईटचा पत्ता, इत्यादी ) परिशिष्ट - 1 येथे नमुद केल्याप्रमाणे आहे. मंडळाची आवश्यकता/ निर्मिती/ कार्यपध्दती, या बाबतची माहिती परिशिष्ट-2 येथे नमुद केल्याप्रमाणे आहे. मंडळाची रचना व कार्यासन निहाय विषयसुची याबाबतची माहिती अनुक्रमे परिशिष्ट - 3 (अ) व 3 (ब) येथे नमुद केल्याप्रमाणे आहे. तसेच मंडळामार्फत नागरिकांना देण्यात येणा-या सेवा व संहिता परिनिरीक्षणासाठी आकारण्यात येणा-या पूर्वपरिक्षण शुल्का बाबतची माहिती अनुक्रमे परिशिष्ट - 4 (अ) व 4 (ब) येथे नमुद केल्याप्रमाणे आहे.
कार्यपूर्तीचे वेळापत्रक
रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळामार्फत नागरिकांना प्रत्यक्ष पुरविण्यात येणा-या सेवांच्या कार्यपूर्तीचे वेळापत्रक परिशिष्ट - 4 (अ) येथे नमुद केल्याप्रमाणे आहे.
नियम / शासन निर्णय
या विभागाशी संबंधीत नियम अथवा महत्वाचे शासन निर्णय www. maharashtra.gov.in या शासनाच्या संकेत स्थळांवर पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या शिर्षाखाली उपलब्ध आहे. या विभागांशी संबंधीत वेळोवेळी निर्गमित होणारे नियम व शासन निर्णयाबाबतची माहिती उपरोक्त संकेत स्थळांवर अदयावत करण्यात येते.
गा-हाणी तक्रारी यांचे निराकरण
कार्यपूर्तीस होणार विलंब वा अन्य काही गा-हाणी असल्यास त्यासंबंधी तक्रार नोंदविता येईल व तक्रार प्राप्त झाल्यापासून 7 दिवसात त्या बाबत यथायोग्य कार्यवाही करण्याची जबाबदारी संबंधीत अधिका-यांची राहिल. यानंतरही नागरिकांचे समाधान न झाल्यास मंडळाचे सचिव, यांचेकडे या बाबत त्यांना तक्रार करता येईल. गा-हाणी समक्ष भेटी/ पत्राने तथा ई- मेल व्दारेही मांडता येईल.
नागरीकांच्या सनदेचा आढावा/ सिंहावलोकन
नागरीकाच्या या सनदेच्या उपयुक्ततेबाबत तथा परिणामकारकतेचा आढावा रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाकडून दर वर्षी 2 मे पूर्वी घेण्यात येईल. व त्यात आवश्यकतेनुसार बदल करण्यात येईल.
जनसामान्यांकडून सुचना
ही नागरीकांची सनद सर्वसामान्य नागरीकांच्या छाननीसाठी नेहमीच खुली आहे. त्यांच्या सुचनांचा दर वर्षी सुधारणा करताना विचार करण्यात येईल.
रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ, नागरिकांच्या या सनदेची अंमलबजावणी करण्यास कटिबध्द आहे. मंडळ आपल्या सेवा कर्तव्य भावनेने व कार्यतत्परतेने उपलब्ध करुन देण्याची हमी देत आहे. या सेवा पुरविताना नागरिकांना सौजन्यपूर्ण वागणूक देण्याची जबाबदारी प्रत्येक अधिकारी व कर्मचा-यांची राहील.
परिशिष्ट - 1
अ.क्र. | पत्ता | फोन नंबर | ईमेल आयडी |
---|---|---|---|
01 | रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ, मुंबई 2 रा मजला ठाकरसी हाऊस, शुरजी वल्लभदास मार्ग, बेलार्ड इस्टेट, मुंबई 01 | 022-35102885 | mumbairangbhumi@gmail.com |
02 | नागरीकांना देण्यात येणा-या ऑनलाईन सेवा व त्यासाठी असणा-या website चा address 1) ऑकेस्ट्रा तमाशा, मेळा, नाटक आयोजित करण्यासाठी प्रमाणपत्र देणे तसेच सार्वजनिक ठिकाणी होणा-या एक दिवसाच्या कार्यक्रमाना ना- हरकत प्रमाणपत्र देणे (उपरोक्त नमुद ऑकेस्ट्रा या कार्यक्रमास पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शा.नि. एसपीबी2016/ प्र.क्र. 244/ सां.का.1 दि. 27/10/2017 अन्वये मंडळाच्या योग्यता प्रमाणपत्राची/ परवानगीची आता आवश्यकता नाही) 2) सर्व भाषेतील प्रायोगिक/ व्यावसायिक नाटय संहितांना प्रमाणपत्र देणे |
http://www.applesarkar.mahaonline.gov.in |
परिशिष्ट - 2
अ.क्र. | मंडळाची स्थापना |
---|---|
01 | सार्वजनिक ठिकाणी रंगमंचावर सादर होणा-या प्रयोगाच्या संहितांचे पूर्व परिक्षण करण्यासाठी मुंबई पोलिस अधिनियम 1951 मधील कलम 33 (1) (Wa) (iii) नुसार तमाशा, मेळा व रास इत्यादी मनोरंजनाच्या कार्यक्रमांच्या संहिताचे पूर्व परिक्षण करुन सदर कार्यक्रमांना योग्यता प्रमाणपत्र ( Suitability Certificate ) देण्यासाठी गृहविभागाच्या क्र. 2701/ 5 - Poll दिंनाक 05/ 01/ 1954 रोजीच्या अधिसुचनेव्दारे रंगभूमी प्रयोग परिनिरिक्षण मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. प्राप्त संहितांचे पूर्व परिक्षण रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळातील साहित्य, कला क्षेत्रातील अनुभवी / तज्ञ मान्यवरांकडून करण्यात येते व त्यानंतर योग्यता प्रमाणपत्र देण्यात येते ही संपूर्ण कार्यवाही सार्वजनिक मनोरंजनांच्या जागा ( सिनेमाव्यतिरिक्त ) आणि मेळे व तमाशे धरुन, सार्वजनिक मनोरंजनाचे प्रयोग यांना अनुज्ञप्ती देणे व त्यावर नियंत्रण ठेवणे. नियम 1960 तसेच सुधारीत नियम 1974 मधील Chapter XII नियम 137 ते 145 -अ नुसार करण्यात येते . |
02 | पूर्व परिक्षणाची आवश्यकता सार्वजनिक करमणुकीच्या कोणत्याही कार्यक्रमामुळे, भारताचे सार्वभौमत्व आणि एकात्मता किंवा राज्याची सुरक्षितता, परकिय राष्ट्राची किंवा कोणत्याही समाजाची किंवा कोणत्याही धर्माच्या अनुयायांची भावना न दुखावणे, सभ्यता किवा नीतिमत्ता यांना बाधा येऊ नये, न्यायालयाचा अवमान होऊ नये, कोणत्याही श्रेष्ठ व्यक्तीची किंवा साहित्यीक, सामाजिक, सांस्कृतिक किंवा राजकीय क्षेत्रातल्या सुप्रसिध्द अशा कोणत्याही व्यक्तीची बदनामी होऊ नये. तसेच सार्वजनिक सुव्यवस्था याची दक्षता घेणे, हा लिखाणाच्या संहितांचे पूर्वपरिक्षण करण्यामागचा उद्देश आहे. शासनामार्फत मंडळाचे अध्यक्ष व सदस्य यांची नियुक्ती तीन वर्षानी केली जाते, ते मराठी, हिंदी, संस्कृत व इंग्रजी लिखाणाचे परिक्षण करतात. अध्यक्षांनी नियुक्त केलेले मानसेवी वाचक इतर भाषेच्या लिखाणाचे परिक्षण करतात. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शासन निर्णय क्र. एसपीबी-2010/प्र.क्र.293/सां.का.1, दिनांक 12 ऑक्टोबर, 2010 नुसार निरनिराळया लिखाणासाठी पूर्वपरिक्षण शुल्क स्विकारले जाते. |
03 | कार्यपध्दती संपूर्ण महाराष्ट्रात मंडळाचे एकच कार्यालय असून ते मुंबई येथे आहे. सार्वजनिक रंगमंचावर सादर होणा-या करमणूकीच्या कार्यक्रमाच्या हस्तलिखित संहितांचे पूर्वपरिक्षण करुन त्यांना सार्वजनिक मनोरंजनाच्या जागी कार्यक्रम सादर करण्यासाठी योग्यता प्रमाणपत्र देणे हे या मंडळाचे प्रमुख कार्य आहे.
|
परिशिष्ट - 3 (अ)
कार्यालयाची रचना
परिशिष्ट - 3 (ब)
कार्यासन निहाय विषय सुची
अ.क्र. | अधिकारी / कर्मचारी | कार्यासन | विषय |
---|---|---|---|
1 | सचिव | विभाग प्रमुख | रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे नियंत्रक अधिकारी व विभाग प्रमुख म्हणून असणा-या सर्व जबाबदा-या |
2 | 1) अधीक्षक 2) लि.टंकलेखक |
आस्थापना | अर्थसंकल्पीय अंदाज,कार्यक्रम अंदाजपत्रक तयार करणे, लेखनसामुग्री व दैंनदिनी/दिनदर्शिकाचे मागणीपत्रक तयार करणे, दैनंदिन येणा-या पत्र व्यवहारास उत्तरे देणे, खर्चमेळ व चलन यांचा ताळमेळ ठेवणे व सचिव यांनी नेमून दिलेली इतर प्रशासन विषयक कामे |
3 | 1) वरिष्ठ लिपिक 2) लि.टंकलेखक |
लेखा शाखा | अर्जदाराना प्रदानाची पावती देणे, रोखनोंदवही अदयावत ठेवणे, देयके तयार करणे, देयकाचा व केलेल्या खर्चाचा ताळमेळ ठेवणे, पूर्वपरिक्षण शुल्कान्वये जमा झालेली रक्कम तसेच GST चलनाद्वारे रिर्झव्ह बँकेत भरणे. रिर्झव्ह बँकेत भरलेल्या रकमाचा ताळमेळ ठेवणे. अधिक्षक यांनी नेमुन दिलेली इतर कामे. |
4 | 1) लिपिक - टंकलेखक 2) लिपिक - टंकलेखक |
संहिताशाखा | स्विकारण्यात आलेल्या लिखाणाची/ संहितेची आवक नोंदवही व लिखाणाच्या नोंद वहीत नोंद घेणे, पूर्वपरिक्षणासाठी सदस्यांना संहिता पोस्टाने पाठविणे व त्याची जावक नोंदवहीत मध्ये नोंद घेणे, मा. अध्यक्षांची स्वाक्षरी झालेल्या प्रमाणपत्राची प्रमाणपत्र नोंदवहीत नोंद घेणे. तयार झालेली प्रमाणपत्रे संबंधित अर्जदारास पोस्टाने पाठविण्यासाठी पाकिटे तयार करणे व त्याची जावक नोंदवहीत नोंद घेणे, केलेल्या पत्रव्यवहाराची जावक नोंदवहीत नोंद घेऊन अर्जदारास पत्र पाठवणे, टंकलेखकाची इतर कामे. |
5 | 1) दप्तरी | टपालशाखा | लिखाणाची नोंदवही, प्रमाणपत्राची नोंदवही, आवक नोंदवही, लिखाणाचे अर्ज, सदस्यांचे अभिप्राय, तयार झालेले प्रमाणपत्र, इ. अद्यावत ठेवणे, स्विकारलेल्या संहिता अद्यावत ठेवणे. कार्यालयातील सर्व शासकीय दस्तावेज सुरक्षित व अदयावत ठेवणे अभिलेखागाराशी संबंधित कामकाज इ. |
6 | 1) शिपाई 2) शिपाई |
- | 1) अधिदान व लेखा कार्यालयाशी संबंधीत कामकाज, पदाचे कार्यालयीन दैनदिन कामकाज. 2) कार्यालयात परिक्षणासाठी प्राप्त झालेल्या संहिता सदस्यांकडे पूर्वपरिक्षणासाठी नेणे, पूर्वपरिक्षण झालेल्या संहिता सदस्याकडून अभिप्रायासह आणणे, मंडळाच्या अभिलेखागारा संबंधित सर्व कामकाज |
परिशिष्ट - 4 ( अ)
नागरीकांना पुरविण्यात येणा-या सेवा
अ.क्र. | सेवांचा तपशिल | सेवा पुरविण्याची विहित मुदत |
---|---|---|
1 | ऑकेस्ट्रा तमाशा, मेळा, नाटक आयोजित करण्यासाठी प्रमाणपत्र देणे तसेच सार्वजनिक ठिकाणी होणा-या एक दिवसाच्या कार्यक्रमाना ना- हरकत प्रमाणपत्र देणे (उपरोक्त नमुद ऑकेस्ट्रा या कार्यक्रमास पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शा.नि. एसपीबी2016/ प्र.क्र. 244/ सां.का.1 दि. 27/10/2017 अन्वये मंडळाच्या योग्यता प्रमाणपत्राची/ परवानगीची आता आवश्यकता नाही) | सेवा हमी कायदयानुसार रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कार्यालयीन कामकाजाचे 10 दिवस |
2 | सर्व भाषेतील प्रायोगिक/ व्यावसायिक नाटय संहितांना प्रमाणपत्र दणे | सेवा हमी कायदया नुसार रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कार्यालयीन कामकाजाचे 10 दिवस |
परिशिष्ट - 4 ( ब )
संहिता / लिखाणाचे पुर्वपरिक्षण शुल्क
माहितीचा अधिकार
अ.क्र. | संहिताचा तपशील | सुधारीत पूर्वपरिक्षण शुल्क |
---|---|---|
1 | नाटक:- प्रायोगिक व्यावसायिक |
रु. 250/- रु. 1,000/- |
2 | एकांकिका | रु. 100/- |
3 | विविध करमणुकीचा सांस्कृतिक कार्यक्रम (शाळा व कॉलेज) (पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शा.नि. एसपीबी2016/ प्र.क्र. 244/ सां.का.1 दि. 27/10/2017 अन्वये सदर कार्यक्रमास मंडळाच्या योग्यता प्रमाणपत्राची/ परवानगीची आता आवश्यकता नाही.) नाटयगृहामध्ये होणारा अन्य कार्यक्रम (एक दिवसासाठी) |
रु. 250/- रु. 1,000/- |
4 | लोकनाटय (दोन किंवा तीन अंकासाठी) | रु. 250/- |
5 | तमाशा वर्ग | रु. 250/- |
6 | वाद्यवृंद :- मराठी हिंदी इतर प्रादेशिक भाषेच्या वाद्यवृंदासाठी (पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शा.नि. एसपीबी2016/ प्र.क्र. 244/ सां.का.1 दि. 27/10/2017 अन्वये सदर कार्यक्रमास मंडळाच्या योग्यता प्रमाणपत्राची/ परवानगीची आता आवश्यकता नाही. ) |
रु. 500/- रु. 1,000/- रु. 500/- |
7 | संगीत बारी - मराठी गीते | रु. 250/- |
8 | मेळे | रु. 100/- |
9 | हॉटेल/बार/रेस्टॉरंट इत्यादी ठिकाणी चालणारे वाद्यवृंद (एक वर्षासाठी) (पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शा.नि. एसपीबी2016/ प्र.क्र. 244/ सां.का.1 दि. 27/10/2017 अन्वये सदर कार्यक्रमास मंडळाच्या योग्यता प्रमाणपत्राची/ परवानगीची आता आवश्यकता नाही. ) |
रु. 3,000/- |
10 | सप्तताराकिंत हॉटेल:- 3 स्टार, 4स्टार, 5 स्टार/क्लब/जिमखाना या ठिकाणी चालणारे मनोरंजनाचे कार्यक्रम. ((पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शा.नि. एसपीबी2016/ प्र.क्र. 244/ सां.का.1 दि. 27/10/2017 अन्वये सदर कार्यक्रमास मंडळाच्या योग्यता प्रमाणपत्राची/ परवानगीची आता आवश्यकता नाही.) | रु. 5,000/- |
11 | जादुचे प्रयोग प्रति वर्षासाठी. (पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शा.नि. एसपीबी2016/ प्र.क्र. 244/ सां.का.1 दि. 27/10/2017 अन्वये सदर कार्यक्रमास मंडळाच्या योग्यता प्रमाणपत्राची/ परवानगीची आता आवश्यकता नाही.) | रु. 500/- |
12 | प्रमाणपत्राची नक्कल. | रु. 100/- |
13 | संबंधित व्यक्तिंना नाटय संहिता उपलब्ध करुन देणे | रु. 100/- |
14 | गरबा, दांडिया रास. हॉटेल व्यवस्थापनाचा 1 दिवसाचा चालणारा मनोरंजनाचा कार्यक्रम (उदा. बर्थ डे पार्टी, मॅरेज पार्टी) (पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शा.नि. एसपीबी 2016/ प्र.क्र. 244/ सां.का.1 दि. 27/10/2017 अन्वये सदर कार्यक्रमास मंडळाच्या योग्यता प्रमाणपत्राची/ परवानगीची आता आवश्यकता नाही.) |
रु. 1,000/- रु. 1,000/- |
15 | रामलीला महोत्सव (पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शा.नि. एसपीबी2016/ प्र.क्र. 244/ सां.का.1 दि. 27/10/2017 अन्वये सदर कार्यक्रमास मंडळाच्या योग्यता प्रमाणपत्राची/ परवानगीची आता आवश्यकता नाही. ) |
रु. 250/- |
16 | शिर्षक बदल | रु. 100/- |
रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ, महाराष्ट्र शासन
2 रा मजला ठाकरसी हाऊस, शुरजी वल्लभदास मार्ग, बेलार्ड इस्टेट, मुंबई -1 केंद्र शासनाचा माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या कलम 5 (1) व 5 (2) नुसार सहायक जन माहिती अधिकारी / जन माहिती अधिकारी/ अपिलीय अधिकारी पदनिर्देशित करणे.
कार्यालयाचे नाव | सहायक जन माहिती अधिका-याचे नाव व पदनाम | जन माहिती अधिका-याचे नाव व पदनाम | कार्यालयीन पत्ता | कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक | प्रथम अपीलीय अधिका-याचे नाव व पदनाम | कार्यालयीन पत्ता | कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक |
---|---|---|---|---|---|---|---|
रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ, मुंबई | श्री. शरद महादेव सागवेकर वरीष्ठ लिपिक | श्री.दिलीप चंद्रकांत वाघमारे, अधीक्षक | रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ, 2 रा मजला ठाकरसी हाऊस, शुरजी वल्लभदास मार्ग, बेलार्ड इस्टेट, मुंबई -1 | 022-35102885 | श्री. संतोष पुंडलिक खामकर, सचिव | रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ, 2 रा मजला ठाकरसी हाऊस, शुरजी वल्लभदास मार्ग, बेलार्ड इस्टेट, मुंबई -1 | 022-35102885 |
कलम 4 (1) (क) मधील तरतुदीप्रमाणे रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ या सार्वजनिक प्राधिकरणात उपलब्ध असलेल्या सर्व अभिलेख्यांची निर्देशसूची
अ.क्र. | विषय | दस्तवेज/नस्ती/नोंदवही यापैकी कोणत्या प्रकारात उपलब्ध | नस्ती क्र./नोंदवही क्र. | तपशील | माहिती किती काळापर्यंत सांभाळून ठेवली जाते ? |
---|---|---|---|---|---|
1 | रंगभूमी मंडळाच्या स्थापनेपासून उपलब्ध असलेल्या म्हणजेच सन 1954 पासून नाटय संहिता व योग्यता प्रमाणपत्र इत्यादी | दस्तावेज (वर्षनिहाय) स्वरुपात | - | मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे परिक्षण करुन सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम करण्यासाठी मंडळातर्फे देण्यात आलेल्या योग्यता प्रमाणपत्राचे (Suitability Certificate) संबंधिनाटय संहिता इत्यादी दस्तावेजाचे वर्षनिहाय वर्गीकरण करुन ते महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ ( दादासाहेब फाळके चित्रगनरी ) गोरेगांव मुंबई येथील रंगभूमी मंडळाच्या अभिलेखकक्षात जतन करुन ठेवण्यात आलेले आहे. सन 1954 ते सन 2017 पर्यंतचा दस्तावेजाचे उपलब्ध साधन संपत्तीनुसार संगणकीकरण (Digitisation) करण्यात आले आहे. | कायम स्वरुपात |
2 | इतर कार्यालयीन दस्तावेज | नोंदवही रजिस्टर व दस्तावेज स्वरुपात | - | माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 4 (1) (ख) (सहा) नुसार केलेल्या वर्गीकरण मध्ये उपलब्ध करुन दिलेल्या तपशिलाप्रमाणे | कायम स्वरुपात |