विभागाबद्दल
सार्वजनिक ठिकाणी रंगमंचावर सादर होणा-या प्रयोगाच्या संहितांचे पूर्व परिक्षण करण्यासाठी मुंबई पोलिस अधिनियम 1951 मधील कलम 33 (1) (Wa) (iii) नुसार तमाशा, मेळा व रास इत्यादी मनोरंजनाच्या कार्यक्रमांच्या संहिताचे पूर्व परिक्षण करुन सदर कार्यक्रमांना योग्यता प्रमाणपत्र ( Suitability Certificate ) देण्यासाठी गृहविभागाच्या क्र. 2701/ 5 - Poll दिंनाक 05/ 01/ 1954 रोजीच्या अधिसुचनेव्दारे रंगभूमी प्रयोग परिनिरिक्षण मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. प्राप्त संहितांचे पूर्व परिक्षण रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळातील साहित्य, कला क्षेत्रातील अनुभवी / तज्ञ मान्यवरांकडून करण्यात येते व त्यानंतर योग्यता प्रमाणपत्र देण्यात येते ही संपूर्ण कार्यवाही सार्वजनिक मनोरंजनांच्या जागा ( सिनेमाव्यतिरिक्त ) आणि मेळे व तमाशे धरुन, सार्वजनिक मनोरंजनाचे प्रयोग यांना अनुज्ञप्ती देणे व त्यावर नियंत्रण ठेवणे. नियम 1960 तसेच सुधारीत नियम 1974 मधील Chapter XII नियम 137 ते 145 - अ नुसार करण्यात येते.
रंगभूमी मंडळाकडून नागरिकांना योग्यता प्रमाणपत्र देण्यात येणा-या विविध सार्वजनिक मनोरंजाच्या कार्यक्रमांचा शासनाने “ Ease of doing business “ अंतर्गत आढावा घेवून, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, शासन निर्णय दिंनाक 27 ऑक्टोबर 2017 अन्वये अनावश्यक व कालबाहय झालेले कार्यक्रम योग्यता प्रमाणपत्र घेण्याच्या अटीतून वगळले आहेत.
सार्वजनिक करमणुकीच्या कोणत्याही कार्यक्रमामुळे, भारताचे सार्वभौमत्व आणि एकात्मता किंवा राज्याची सुरक्षितता, परकिय राष्ट्राची किंवा कोणत्याही समाजाची किंवा कोणत्याही धर्माच्या अनुयायांची भावना न दुखावणे, सभ्यता किवा नीतिमत्ता यांना बाधा येऊ नये, न्यायालयाचा अवमान होऊ नये, कोणत्याही श्रेष्ठ व्यक्तीची किंवा साहित्यीक, सामाजिक, सांस्कृतिक किंवा राजकीय क्षेत्रातल्या सुप्रसिध्द अशा कोणत्याही व्यक्तीची बदनामी होऊ नये. तसेच सार्वजनिक सुव्यवस्था याची दक्षता घेणे, हा लिखाणाच्या संहितांचे पूर्वपरिक्षण करण्यामागचा उद्देश आहे. शासनामार्फत मंडळाचे अध्यक्ष व सदस्य यांची नियुक्ती तीन वर्षानी केली जाते, ते मराठी, हिंदी, लिखाणाचे परिक्षण करतात. अध्यक्षांनी नियुक्त केलेले मानसेवी वाचक इतर भाषेच्या लिखाणाचे परिक्षण करतात. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शासन निर्णय क्र. एसपीबी-2010/प्र.क्र.293/सां.का.1, दिनांक 12 ऑक्टोबर, 2010 नुसार निरनिराळया लिखाणासाठी पूर्वपरिक्षण शुल्क स्विकारले जाते.
हे कार्यालय सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय या प्रशासकीय विभागाच्या नियंत्रणाखाली ठाकरसी हाऊस, 2 रा मजला, शुरजी वल्लभदास मार्ग, बेलार्ड इस्टेट फोर्ट मुंबई -1 येथे कार्यरत आहे.