Home Banner
-
श्री. विकास खारगे
मा. प्रधान सचिव, सांस्कृतिक कार्य
मा. प्रधान सचिव, सांस्कृतिक कार्य
सार्वजनिक मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे पूर्वपरिक्षण करण्यासाठी मुंबई पोलिस अधिनियम 1951 मधील कलम 33 (1) (wa)(iii) अन्वये दिंनाक 05 जानेवारी 1954 रोजीच्या अधिसूचनेनुसार रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची स्थापना झालेली आहे. सार्वजनिक मनोरंजनाच्या जागा ( सिनेमाव्यतिरिक्त) आणि सार्वजनिक मनोरंजनाचे प्रयोग मेळे व तमाशा धरुन यांना अनुज्ञप्ती देणे व त्यावर नियंत्रण ठेवणे - नियम 1960 व सुधारीत नियम 1974 मधील नियम 137 ते 145 (अ)अन्वये रंगभूमी मंडळाची कार्यपध्दती तसेच अनुसरावयाची सर्वसाधारण तत्वे निश्चित करण्यात आली आहेत. या कार्यपध्दतीनूसार मंडळाकडून सार्वजनिक ठिकाणी सादर होणा-या मनोरंजनाच्या (नाटक/ एकांकिका/ लोकनाटय/तमाशावग/मेळे इत्यादी) कार्यक्रमासाठी नागरिकांनी सादर केलेल्या लिखाणांचे पूर्वपरिक्षण करुन त्यांना कायमस्वरुपी योग्यता-प्रमाणपत्र(Suitability Certificate)देण्यात येते.
सार्वजनिक करमणूकीच्या कार्यक्रमांमुळे सार्वजनिक सुव्यवस्था, सभ्यता ,नितीमत्ता तसेच देशाचे सार्वभौमत्व आणि सुरक्षितता, एकात्मता यांना बाधा येणार नाही. व कोणत्याही प्रकारे कायदयाचे उल्लघन होणार नाही. याची दक्षता घेणे हा पूर्वपरिक्षणामागचा उद्देश आहे. या उदिष्टपूर्तीसाठीच आधारभूत संहितेच्या लिखाणाचे पूर्वपरिक्षण मंडळाकडून करण्यात येते.